जर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचार्‍यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्डाणे रद्द

17 Jan 2019 17:33:07
फ्रँकफर्ट (जर्मनी) :  जर्मनीत विमानतळ सुरक्षा कर्मचार्‍यांच्या काम बंदमुळे शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली आहे. त्यामुळे सुमारे 2 लाख 20 हजार प्रवाशांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. फ्रँकफर्ट विमानतळासह आठ विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांनी सहा तास काम बंद ठेवल्याने विमान वाहतूक विस्कळित झाली.
 
मंगळवारी 2 पासून 8 वाजेपर्यंत फ्रँकफर्ट, म्युनिक, हॅनोवर, ब्रीमन, हँबर्ग,लीप्झिग, ड्रेस्डन आणि एर्फर्ट विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांनी वॉक-आऊट केल्याची माहिती एडीव्ही एयरपोर्ट असोसिएशनने दिली. या काळात फ्रँकफर्ट विमानतळावरील 1200 पैकी 617 उड्डाणे रद्द करावी लागली. सुरक्षा कर्मचार्‍यांच्या या कामबंदचा परिणाम विमानतळ, विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवाशांना जाणवला, तसा तो इतर विमानतळावंरही झाला.
सुरक्षा कर्मचार्‍यांना 14 ते 17 युरो प्रतितास असे वेतन देण्यात येते, ते 20 युरो करावे अशी युनियनची मागणी आहे.
Powered By Sangraha 9.0