वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :18-Jan-2019
राजुरा : तालुक्यातील विरुर पासून 2 किमी अंतरावर असलेल्या खांबाडा येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला.  या हल्ल्यात त्या  महिलेचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना  घडली. वर्षा सत्यपाल तोंडासे (३९) असे मृतक महिलेचे नाव आहे .
 
मृतक महिला ही भाऊ मनोज शेडमाके व सासू अनुसया तोडासे यांच्यासोबत जोगापूर जंगलात गेली होती. राजुरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७७ मध्ये झाडाची पाने तोडत असताना अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला . बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर मनोज यांनी  लाठीकाठी घेऊन धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वाघाने वर्षा यांच्या जागीच मृत्यू झाला.