कोलंबियात दहशतवादी हल्ला ; 20 ठार, 72 जखमी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
बोगोटा : येथील पोलीस अकादमीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या आत्मघातकी कार बॉंब हल्ल्यात 20 जण ठार झाले असून 72 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान डुके यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अकादमीबाहेर एक मोटर कार वेगाने आली, तिने चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मींनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वेग आणखी वाढवून ड्रायव्हरने कार अकादमीच्या भिंतीवर आदळली. त्यानंतर जोरदार स्फोट झाला. हा स्फोट होण्यापूर्वी काही वेळ अकादमीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ झाला होता.
कार भिंतीवर आदळल्यानंतर झालेला स्फोट इतका भयंकर होता की जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांची काचे फुटली.  या स्फोटामागे कोणाचा हात आहे याबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही.
कोलंबियात शांतिवार्ता चालू करण्याच्या पद्धतीवरून अध्यझ इव्हान ड्यूक यांच्याशी मतभेद असल्याकारणाने नॅशनल लिबरेशन आर्मीच्या डाव्या गटाकडून हल्ले होत आहेत. सन 2016 व्या शांती करारामुळे देशातील सर्वात मोठ्या बंडखोर गटाला मोठाच धक्का बसल्याने गेल्या काही महिन्यात दहशत वादी हल्ल्यांमध्ये कमी आली होती.
कालच्या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.