िंवदांच्या कवितेतील ती...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
मराठी साहित्यविश्वातच नव्हे, तर संपूर्ण भारतीय साहित्यातही सर्वात मानाचा समजला जाणारा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्रातील ज्या मान्यवर साहित्यिकांना मिळाला, त्यातील एक महत्त्वाचे साहित्यिक म्हणजे िंवदा करंदीकर. िंवदांचे स्वेदगंगा, धृपद, जातक, विरूपिका, मृद्गंध हे पाच महत्त्वाचे कवितासंग्रह, अष्टदर्शने हा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त संग्रह प्रकाशित आहे. राणीचा बाग, एकदा काय झाले, सशाचे कान असे काही महत्त्वाचे बालकवितासंग्रह, लघुनिबंध, साहित्यशास्त्रावरील अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, परंपरा आणि नवता, अशी महत्त्वाची ग्रंथसंपदा िंवदांच्या नावावर आहे. िंवदांच्या कवितेमधून भारतीय समाजातील स्त्री रूप मनाला भावणारे आणि मोहक असे आहे. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव करंदीकरांनी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञासारखे चिकित्सक नजरेतून टिपले आहे, हे त्यांच्या कविता वाचताना प्रकर्षाने जाणवते. भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत या कवितेत म्हणतात, कर कर करा, मर मर मरा
कुढ कुढ कुढा, चिडचिड चिडा; झीज झीज झिजा, शिजवा आणि शिजा... कर्तव्य करत मरण पत्करणे, जीवन जगताना मनातल्या मनात आपल्या इच्छा-आकांक्षा दडपून मनातले राग, लोभ व चीड कधी व्यक्त किंवा अव्यक्त ठेवणे, तन-मन दोन्हीची झीज होऊ देणे, दोन वेळचे अन्न शिजवणे आणि त्यातच संपूर्ण आयुष्य घालवणे, अगदी स्वतःचे आयुष्यही शिजावयास टाकण्यासारखे आयुष्य जगणे, ही भारतीय स्त्रीची मानसिकता नेमक्या शब्दांत मांडून, तिच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम िंवदा करंदीकरांनी सहज शब्दांत साध्य केले आहे. त्यात कुठेही शब्दांचा सोस नाही किंवा व्यर्थ शब्दांचे अवडंबर नाही. स्त्रियांच्या शोषणाची कथा मांडताना िंवदांनी उभे केलेले एक महत्त्वाचे पात्र म्हणजे बकी. बकी ही एक वेश्या असून पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या मुलीचे मरण विसरून शरीरविक्रय करण्यास गिर्‍हाईक शोधणारी. स्वतः महारोगाने पीडित आहे. मूळचे बकुळा नाव असलेली बकी गिर्‍हाईक मिळत नाही म्हणून दुःखी होते आणि कवी तिचे दुःख मांडताना लिहितात-

 
दत्ताच्या दिमतीला तिने आणले होते आता साई महाराज, तसबिरीपुढे उदबत्ती लावताना म्हणायची तिन्हीसांजेला, ‘‘एकट्या दत्तावर किती भार घालायचा, घेणारा झाला म्हणून...?’’
वरील ओळीतून तिचे दुःख एका देवाच्याने पेलणारे नाही, याची प्रकर्षाने जाणीव करून देण्याचे काम कवीने केले आहे. िंवदांची अशीच स्त्रीच्या मनाचे वर्णन करणारी कविता म्हणजे संसार. अतिशय गरीब परिस्थिती आली, त्यातही विद्रूप पती व त्याच वळणावर गेलेला मुलगा, यामुळे तिच्या मनात येणारा सळाळ व्यक्त करताना कवी म्हणतात,
तशी तीही नव्हती सरळ, वळणे होती तिच्या स्वभावात वईतल्या वेलीसारखी, जवळच्या दगडाहून पुढे झेपावून प्रसंग पडला तर तिचे पाऊल आडवाटेवर किंवा वाकडं पडू शकते, हे थोडक्यात सुचवून हालाखीचे जीवन आणि मन मारून जीवन जगणार्‍या स्त्रीच्या संसाराचे वर्णन कवीने केले आहे. अहल्येची शिळा झाली, या प्रतिमेत कवीने अहल्याचे दुःख अधोरेखित केले आहे. िंवदा करंदीकरांच्या कवितेतील व्यक्तिचित्रण फार सजीव असते, असे जाणवते. त्यातही कावेरी डोंगरे या कवितेतील कारकुनी करणार्‍या तरुण मुलीचे चित्र रेखाटताना कवीने आपले शब्दसामर्थ्य पणाला लावले आहे. कावेरी डोंगरेच्या भोवताली असलेला स्वार्थी व संधिसाधू काफिला, हुंडा आणि इतर आर्थिक बाबीमुळे गोखलेने तिचे नाकारलेले प्रेम या सर्वामध्ये कावेरीचे मध्यमवर्गीय दुःख ठसत असते. त्यातही सहकारी मुली इतर मुलांना फितवतात, हे सर्व जाणूनही तिच्या मनातील अस्वस्थता शिगेला पोहोचते तेव्हा, टेबलावरील फाटक्या चिटोर्‍यावर
तिने काढले लंब वर्तुळाचे अक्षर
आणि केले त्याच्या डोक्यावर थोडेसे किजबीज...
अक्षरात भासले तिला, बालकाचे तोंड; किजबिजाटात दिसले केसांचे जावळे...
 
शब्दांतून संसार थाटणे, मातृत्वाचे सुख प्राप्त करून घेणे, स्त्रीसुलभ आकांक्षाही अपूर्ण असून त्यासाठी होणारी तिची तगमग अस्वस्थ करणारी ठरते. िंवदांनी कावेरी डोंगरेप्रमाणेच धोंड्या न्हावी सजीव केला आहे, हे िंवदांच्या कवितेचा अभ्यास करणार्‍या रसिकांना माहीत आहेच. त्यातही धोंड्याच्या विधवेचे दुःख रेखांकित करताना कवी म्हणतात,
धोंड्या न्हावी, गेल्या वर्षी मेला आणिक सुटला
कोसळते घर, उभी असे पडवी पण! जनी बिचारी जी त्याची मागारीन त्यातच खाते उकडून माका न्हेऊन जीतीच जाळा म्हणते घरधनी मेल्यावर जगणे किती दुरापास्त होते हे दाखवत, मरण येत नाही म्हणून जिवंत जाळा, हे सांगण्याचे काम जनी ही विधवा करत आहे. त्यावरून भारतीय समाजात विधवांचे जगणे किती भयावह आहे, याची जाणीव कवी आपल्याला करून देतात. िंवदांनी स्त्री जातीच्या दुःखाचा फार सूक्ष्मपणे अभ्यास केला होता, असे त्यांच्या कविता वाचताना जाणवते.
फार दिवसांनी आली मागारीन माहेराला, स्टेशनात भेटला आणि ओळखीचा टांगेवाला...
खूप दिवसांनी माहेरला परत आलेल्या तरुणीला टांगेवाला ओळखीचा वाटतो, पण ओळख पटत नाही आणि अचानक ओळखीचे आले वाडे, आली आली गेली शाळा,
अगंबाई हाच का तो? तिला चंदू आठवला... आपला शाळकरी मित्र हाच तो टांगेवाला आहे, हे आठवून तिला अजाण कोवळ्या वयातील नाजूक घुसमट आठवते. तो मात्र जाता जाता तिला ओळखून ना ओळखल्यासारखं निघून जातो. तेव्हा ‘माहेराला भेटली ती, थोडी सुखी थोडी कष्टी,’ या ओळीतून माहेरचे माणसाजवळ असल्याचे सुख आणि चंदूसारखे मित्र जवळ नसल्याचे दुःख एकाच ओळीत सामावले आहे, या भावनेला संभ्रमित ठेवून कविता संपते. कीर्तन या कवितेतूनही-
संसारी बायांना छळती त्यांची रडवी पोरे घरी नेऊन त्यांना निजवा म्हणती त्यांचे नवरे...
वरवर ही कविता विनोदी ढंगाची असेल असे वाटत असले, तरीही संसारी बायकांना प्रपंच कीर्तनापासूनही कसा वंचित ठेवतो, हे दाखवून देणारी कविता आहे. त्याच वेळी हा प्रपंच आपल्यासाठी का नाही? अशा व्याकुळ विचाराने कीर्तनातच बसलेल्या-
‘जख्खड म्हातार्‍या विधवेचे
सुरकुतलेले डोळे पाण्याने डबडबले...’ अशा प्रचंड विरोधी संकल्पना मांडत िंवदा करंदीकरांनी समस्त स्त्री जातीचे दुःख मांडले आहे. खर्‍या अर्थाने िंवदांची कविता ही जगण्याचा अर्थ शोधणारी आहे, त्यातही त्यांच्या कवितेतील स्त्री प्रतिमा कधी बिनधास्त, तर कधी वेदनांनी खचलेल्या आहेत. िंवदांच्या कवितेतील स्त्री कधी अल्लड रूप घेऊन येते, तर कधी पोक्त वेदनांचा अर्थ शोधण्यास बाध्य करते.
..............................