भाजपा मित्र पक्षाचे नप मंगरुळपीरवर वर्चस्व.
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
मंगरुळपीर :- नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणुक 19 जानेवारी रोजी संपन्न झाली. त्यामध्ये भाजपा व सहयोगी मित्रपंक्षांच्या सोबतीने सर्व 5 विषयसमित्या अविरोधाने जिकल्या असुन राष्ट्रवादीला एकही समिती मिळू शकली नाही.1. आरोग्य समिती प्रा.विरेंद्रसिह ठाकुर सर 2. बांधकाम समिती:- निदा फिरदोस जहागीरदार 3.पाणीपुरवठा समिती :- आकाश प्रकाश संगत,4.शिक्षण समिती :- मो. अफसर मो.अकबर, 5.महिला व बांधकाम समिती :- सलमा परिवन मो इरफान हे या समितच्या सभापतीपदी निवडुन आले.

 
यामध्ये भाजपाचे नगरसेवक अनिल गांवडे, सचिन पवार, सौ.ज्योती विशाल लवटे, उषाताई हिवरकर, नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे, नगर सेवक ॲड मारुफ खान साहेब, कॉग्रेसचे उबेद मिर्झा, यांच्या सहकार्याने तसेच भाजपाचे नेते आमदार राजेद्र पाटणी, सुरेशभाऊ लुंगे, नगराध्यक्षा प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, भाजपा शहर अध्यक्ष:- श्यामभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष शमोसद्दिन जाहगिरदार, विशाल लवटे, सतिष हिवरकर, सलीम जाहागिरदार यांच्या अथक प्रयत्नाने या निवडणुकीमध्ये यश संपादन झाले असल्याचे शहर भाजपा तर्फे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. निवडणुक अधिकारी म्हणुन धनंजय गोगटे, एस.डि.ओ. मंगरुळपीर, नगर परिषद मुख्याधिकारी मिलींद दारोकार यांनी निवडणुक पार पाडली.