विदर्भाचा उपांत्य फेरीत प्रवेश
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर रंगलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या पाचव्या दिवशी पाहुण्या उत्तराखंड संघाला उमेश यादव आणि आदित्य सरवटेच्या भेदक माऱ्यापुढे फार काळ तग धरता आला नाही.

 
उत्तराखंड संघाचा दुसरा डाव १५९ धावांवर आटोपला. यात उमेश यादव आणि आदित्य सरवटेने प्रत्येकी ५ बळी\घेतले.    
त्यामुळे विदर्भाने या सामन्याय एक डाव ११५ धावांनी दणदणीत विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत विदर्भाची गाठ केरळशी पडणार आहे.