निराधारांना धनादेशाचे वितरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. अशोकजी नेते यांच्या हस्ते ब्रम्हपुरी पंचायत समितीचे सभागृहात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तथा निराधार महिलांना अनुक्रमे 1 लाख व 20 हजाराचे धनादेश प्रदान करण्यात आले.

 
यावेळी ब्रम्हपुरी पंसच्या सभापती प्रणाली मैंद, उपसभापती विलास उरकुडे, जिप सदस्य दिपालीताई मेश्राम, पं स गटनेता रामलाल डोनाडकर, पं स सदस्य सुनंदाताई धोटे, ऊर्मिला ताई धोटे, ममताताई कुंभारे, सुनीता ताई ठवकर, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, बिडीओ बिरामवार, भाजपा तालुकाध्यक्ष नानाजी तूपट, परेश शहादनी, नगरसेवक मनोज वठे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तथा भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.