9 महिन्यांच्या बालिकेला घेवून पळालेला आरोपी अटक, बालीका सुखरूप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
फिर्यादी विद्या अनंतराव नेहारे यांनी पोलिस स्टेशनला काल शुक्रवारी तक्रार दिली की, फिर्यादी ही आपले घरी हजर असताना तिचा नातेवाईक फिर्यादीचा बहीणीचा दिर निलेश अंबाडरे रा. हिंगणघाट हा दिनांक 18 ला ५ वाजता फिर्यादी हिला तु माझे सोबत चल असे म्हंटले त्यावर तिने जाण्यास नकार दिला असता नमूद आरोपी याने फिर्यादीची लहान मुलगी अनूश्री वय 9 महिने हिला चाॅकलेट घेवून देण्याकरीता दुकानात घेवून जातो असे म्हणून सोबत घेवून गेला बरेच वेळपर्यंत परत न आल्याने व परीसरात शोध घेतला असता मिळून आल्याने दिनांक 18.01.2018 रोजी 23.40 वा. अप.क्र. 42/2019 कलम 363 भादवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर बालीका ही फक्त 9 महिन्यांची असल्याने व तिच्या जीवाला धोका होण्याची संभावना असल्याने मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी श्री. निलेश ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वर्धा यांना सदर प्रकरणांत गांभीर्याने लक्ष देण्याबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे सदर बालीकेचा शोध व गुन्हयांचे तपासकामी 2 अधिकारी व 3 पथके नेमण्यात आली व त्यांना पुलगांव व हिंगणघाट येथे आरोपी शोध करीता पाठविण्यात आले.
स्था.गु.शा.चे पथकाला संशयीत आरोपी निलेश अंबाडरे यांचेबाबत गोपनीय माहितीगाराकडून माहिती मिळाली की तो वाॅलांदूर, तह. हिंगणघाट येथे लपून आहे. त्यावरून आरोपी निलेश कमलाकर अंबाडरे, वय 31 वर्षे, रा. तहसील वार्ड, हिंगणघाट यांस शिताफीने ताब्यात घेवून बालीका अनूश्री हिला सुखरूप सोडविण्यात आले.