वर्धा शहरावरून जाणार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
आज शनिवार दिनांक १९ रोजी सायंकाळी वर्धा शहरावरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जाणार आहे. ते सायंकाळी 6.36.08 वा. दक्षिण दिशेच्या उजवीकडून (नैऋत्य) येईल व 6.42.07 वा. ईशान्य दिशेकडे रवाना होईल. जातांना ते ठळक तार्‍यांप्रमाणे दिसेल. यावेळी त्याची उंची 406 कि.मी राहील व गती प्रती सेकंद 7.67 की. मी. राहील. यावेळी त्याची तेजस्विता - 3.3 असल्याने ते अत्यंत विलोभनीय दिसेल.