टाटा समूह सुरू करणार लिथियम आयन बॅटरी प्रकल्प
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
टाटा समूह लिथियम आयन बॅटरीच्या प्रकल्पात गुंतवणूक करणार असल्याची माहिती टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे. गुजरातमध्ये टाटा समूह लिथियम आयन बॅटरी प्रकल्प सुरू करणार आहे. व्हायब्रंट गुजरात समीटच्या निमित्ताने चंद्रशेखरन यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर टाटा समूहाचीच एक कंपनी टाटा केमिकल्स सोडा अॅश या रसायनाचे उत्पादन वर्षाकाठी 10 लाख टनांपर्यत नेणार आहे.

टाटा केमिकल्स आणि टाटा मोटर्सचे उत्पादन प्रकल्प याआधीच गुजरातमध्ये कार्यरत आहेत. टाटा मोटर्सचा निर्मिती प्रकल्प साणंद येथे आहे. या प्रकल्पात टीगोर इलेक्ट्रीक कारबरोबरच हॅचबॅक टिअगो, कॉम्पॅक्ट सेडान टीगोर आणि नॅनोचे उत्पादन केले जाते. तर मिथापूर येथे टाटा केमिकल्सचा उत्पादन प्रकल्प आहे. सध्या या प्रकल्पात 8.2 लाख टन सोडा अॅशचे उत्पादन दरवर्षी केले जाते. ही क्षमता वाढवून दरवर्षी 10 लाख टन सोडा अॅशचे उत्पादन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. टाटा समूहासाठी गुजरात हे महत्त्वाचे राज्य आहे. मागील वर्षी गुजरातमधून टाटा समूहाला 18,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, असे मत चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले.