न्यायलयातुन दोन आरोपी पसार-एकाला पोलिसांनी पकडले माञ दुसर्याचा शोध सुरु
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
समुद्रपुर: तालुक्यातिल गिरड पोलिस ठाण्यात ३०७ गुन्हाची नोंद असलेले नागपुर येथिल दोन आरोपिनी समुद्रपुर न्यायालयात शिपाई महिलेला चकमा देत पसार झाले यातिल एक पोलिसांच्या हाती लागला असुन दुसर्याचा शोध पोलिस घेत आहे.
प्राप्त माहीतीनुसार १९ जानेवारीला समुद्रपुर प्रथमश्रेणी न्यायालयात गिरड पोलिस ठाण्यात कलम ३०७ चा गुन्हा दाखल असलेले नागपुर येथिल
शुभम शिरुडे व प्रितम शेंडे हे दोन्ही आरोपि त्यांच्यावरील या ३०७ गुन्हातिल प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्याने या दोद्यांवर असलेला पकड वारंट रद्द करण्यासाठी ते आज नागपुर वरुन वकीला व अटरनीला सोबत घेउन न्यायालयात हजर झाले होते.या वेळी न्यायालयाने त्यांचा वारंट रद्द करण्याचा अर्ज फेटाळुन लावत. या दोद्यांनाही महिला शिपायाच्या ताब्यात दिले असता.या दोद्यांनीही महिल्या शिपायाच्या तावळीतुन न्यायालयातुन पळ काडला या वेळी काही वेळातच शुभम शिरुडे हा पोलिसांच्या हाथी लागला तर पसार झालेल्या प्रतिम शेंडे च्या शोध कार्यासह पोलिस लागले असुन बातमि लिहे पर्यंत आरोपि
प्रितम शेंडे हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता या पसार आरोपिला शोधाण्या करीता समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रविण मुंडे,पोलिस उपनिरीक्षक मिलींद पारडकर,अरविंद येनुकर,स्वप्निल वाटकर,वैभव चरडे,रवि वर्मा यांच्या सह कर्मच्यार्यांचा संपुर्ण ताफा व वाघेडा फॉन्डेशनच्या युवकांनी व शहरातिल युवकांनी पुर्ण समुद्रपुर परीसर पिंजुन काढला असुन बातमि लिहे पर्यंत पोलिसांच्या हाती पसार आरोपी प्रितम शेंडे लागला नव्हता पोलिस त्याचा शोध घेत आहे.