अमित शाहांना एम्स मधून डिस्चार्ज
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
 नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाईन फ्लूमुळे उपचारासाठी 16 जानेवारीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबद्दल तत्यांनी  ट्विट करुन माहिती दिली होती.  आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  
 
 
याबाबत भाजपाचे नेते अनिल बलुनी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे , 'आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पूर्णतः सुधारली आहे. त्यांना एम्समधून डिस्चार्ज देऊन ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. बलुनी यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि शाह यांच्या शुभचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत.