महाराष्ट्राची आघाडी कायम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
 
खेलो इंडिया युवा क्रीडा  स्पर्धेच्या समारोपाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राने आपले आघाडीचे स्थान कायम राखले, तर हरयाणाने बॉक्सिंगमध्ये वर्चस्व कायम राखत आणखी दहा सुवर्णपदकांची भर घातली. महाराष्ट्राच्या संघाने 85 सुवर्णपदकांची कमाई केली. हरयाणाने 62, तर दिल्लीने 48 सुवर्णपदके जिकलीत.
 
शनिवारी दहा सुवर्णपदकांशिवाय हरयाणाने 8 रौप्यपदक व 2 कांस्यपदकेसुद्धा जिकलीत. महाराष्ट्रानेसुद्धा प्रभावी प्रदर्शन करत 4 सुवर्ण, 1 रौप्य व 9 कांस्यपदके पटकावलीत. महाराष्ट्राच्या सुवर्णमय यशात आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटच्या बरूण िंसग, भावेश कट्टीमणी व निखील दुबेने योगदान दिले.
  
राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशने प्रत्येकी एक सुवर्णपदक पटकावले.
हरयाणाने सुवर्णपदके जिकण्यात  मोठा वाटा उचलला असला तरी अंकितचा पराभव हा दिवसाचा आश्चर्यकारक निकाल ठरला. हरयाणा आणखी एका सुवर्णपदकाला मुकला, कारण त्यांचा शशि चोपडा दुखापतीमुळे अंतिम सामना खेळण्यास असमर्थ राहिला, त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या विनाक्षीला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
 
64 किग्रॅ  वजनगटात विश्व युवा रौप्यपदक विजेती व आशियाई सुवर्णपदक विजेती मनीषा हिने पंजाबच्या हरप्रीत कौरला पराभूत केले. मनीषाचा हा सर्वोत्तम सामना ठरला व तिने लौकीकास साजेसा विजय संपादन केला.
 
मुलींच्या गटात आणखी एक उलटफेर हरयाणाच्या राष्ट्रीय कांस्पदक विजेती सपनाने केला. सपनाने चुरशीच्या सामन्यात विश्व युवा कांस्यपदक विजेती उत्तर प्रदेशच्या आस्था पहवा हिला मात दिली.
 
पुरुषांच्या 60 किग्रॅ वजनगटात हरीवंशने विश्व युवा कांस्यपदक व आशियाई युवा कांस्यपदक विजेता हरयाणाच्या अंकितला 4-1 ने पराभूत केले.