मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांचा जलवा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
मुंबई - मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने, तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर महिला गटात महाराष्ट्राच्याच साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले.
 

 
मुंबई मॅरेथॉनमधील पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने याने एक तास पाच मिनिटे आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत विजेतेपदावर कब्जा केला. या गटात शिलाँग येथील एस. थापा याने एक तास सहा मिनिटे आणि 07 सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तर महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याला ओक तास, सहा मिनिटे आणि 38 सेकंद वेळेसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये रेल्वेच्या मीनू प्रजापती हिने एक तास 18 मिनिटे आणि पाच सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदावर नाव कोरले. या गटात मुंबई पोलीस दलाच्या साईगीता नाईक हिने एक तास 19 मिनिटे आणि 1 सेकंद वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. तर रेल्वेची मंजू यादव एक तास 25 मिनिटे आणि 11 सेकंद वेळ नोंदवत तिसऱ्या स्थानी राहिली.
यावर्षीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रीयन धावपटूंनीही छाप पाडली. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवे याने तिसरे तर महिला गटात महाराष्ट्राच्या साईगीता नाईक हिने दुसरे स्थान पटकावले.