तरुण भारत कॉन्क्लेव्ह २०१९ समारोप सोहळा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
 दै. तरूण भारतच्या वतीने आयोजित ‘विदर्भ आणि परिसराचा सर्वांगिण विकास’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपाला आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी  उपस्थित होते. यावेळी तरुण भारतच्या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
 

 
 
शेती आणि सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करीत असतानाच राज्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक प्रकल्प अवघ्या ४ वर्षात प्रगतीच्या मार्गावर आहेत, याची माहिती दिली. अमरावती येथे सुरू करण्यात आलेला टेक्सटाईल पार्क, विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात देण्यात असलेली सवलत, नागरिक-सरकार संबंध आणखी भक्कम करण्यासाठी डिजिटल उपाय आणि पर्यटन विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.