कोहली मोडणार सेहवागचा विक्रम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
ऑकलंड :  
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियात जबरदस्त फलंदाजी करत अनेक विक्रम मोडले आणि आता न्यूझीलंड दौर्‍यातही त्याला अनेक विक्रम नोंदविण्याची संधी आहे. यात भारताचा तडाखेबंद सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी कोहलीला आहे.
  
न्यूझीलंडविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर पाच शतके आहेत व त्याला सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी या दौर्‍यावर दोन शतके ठोकावी लागणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक सहा शतके करणार्‍या भारतीय फलंदाजाचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. या विक्रमात कोहली महान फलंदाज सचिन तेंडुलकरसह (५) संयुक्तपणे दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 

 
 
शतकांच्या विक्रमासह कोहलीला सेहवागचा आणखी एक विक्रम खुणावत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये सेहवाग दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने २३ डावात ११५७ धावा केल्या असून कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला अवघ्या चार धावा हव्या आहेत. कोहलीच्या नावावर १९ डावात ११५४ धावा आहेत. या क्रमवारीत तेंडुलकर १७५० धावांसह आघाडीच्या स्थानावर आहे.
 
न्यूझीलंडमध्ये त्यांच्याचविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये कोहली सातव्या स्थानावर आहे. सध्याच्या संघातील रवींद्र जडेजा व महेंद्रिंसग धोनी हे आघाडीवर आहेत.