मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला बुधवारी हस्तांतरित करण्यात येणार आहे. 23 जानेवारीला म्हणजेच बुधवारी बाळासाहेबांची जयंती आहे, हे विशेष.
माहितीनुसार, महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भूमिगत स्मारक बांधले जाणार आहे. स्मारकासाठी महापौर बंगल्याची 2300 चौरस फुटाची जागा कमी पडल्यास बंगल्यामागील आणि पुढील जागेचाही वापर होणार आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी बंगल्याच्या जागेचा ताबा स्मारक समितीला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पूजनाने बाळासाहेबांच्या स्मारकाचा श्रीगणेशा होणार आहे.