‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ने गाठला शंभर कोटींचा टप्पा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी दिवसागणिक पसंती वाढतच चालली असून, या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई केली आहे. विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम यांच्या अभिनयाने सजलेला हा जाज्वल्य देशभक्ती जागवणारा सिनेमाचे प्रेक्षकांसह समिक्षकांनीही प्रचंड कौतुक केले आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे याविषयीची माहिती दिली. या चित्रपटाने फक्त शंभर कोटींची  कमाईच केली नाही, तर 2019 या वर्षातील तो पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे”, असे ट्विट त्यांनी केले आहे.  
 
 
‘ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’,अशा दमदार संवादामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरला आहे. जम्मू- काश्मीरमधील लष्कराच्या उरी बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ‘उरी’ हा चित्रपट आधारित आहे.