मार्क झुकेरबर्गच्या सुरक्षेवर 52.11 कोटी रुपये खर्च
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
कंपन्या आपल्या पेटेंट्स आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी लाखों रुपये खर्च करते. परंतु त्यापेक्षा जास्त खर्च कंपनी कार्यालयातील काम करणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी करते.

 
 
वायर्डने अमेरिका सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमिशनकडून एक अहवाल गोळा केला आहे. त्यानुसार, 2018 मध्ये आपल्या सीईओच्या सुरक्षेवर खर्च करण्यात फेसबुक सर्वात पुढे आहे. 2017 मध्ये फेसबुकने कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष मार्क झकरबर्ग यांच्या सुरक्षेवर 7.3 मिलियन डॉलर्स म्हणजेच  52.11 करोड रुपये खर्च करण्यात आला आहे. तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सैंडबर्ग यांच्यावर 2.6 मिलियन डॉलर्स म्हणजेच 19.11 करोड रुपये खर्च करण्यात आला आहे.
वायर्डच्या अहवालामध्ये असे म्हटले गेले आहे की, 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी 2.6 मिलियन डॉलर्स म्हणजेच 17 करोड रुपये खर्च केले होते. आज हा खर्च तीन पट्टीने वाढला आहे. तर गेल्या वर्षी झालेल्या इन्वेस्टर्सच्या मिटींगमध्ये फेसबुकने म्हटले होते की, ते मार्क झकरबर्गच्या सुरक्षेवर वर्षाला 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी केली जात आहे.