अंकिताने शेअर केली झलकारीबाईंची झलक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
येत्या 25 जानेवारीला ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री कंगना रानावत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर राणी लक्ष्मीबाईंना साथ देणाऱ्या झुंझार रणरागिणी झलकारीबाई यांची व्यक्तीरेखा अंकिता लोखंडे साकारणार आहे.

कंगना आणि अंकिताने या चित्रपटासाठी घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे विशेष प्रशिक्षण घेतल्यामुळे, प्रेक्षकांमध्ये त्यांची तलवारबाजी पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता असतानाचा एक खास व्हिडिओ अंकिताने शेअर केला आहे. यात अंकिताची तलवारबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
अंकिताने हा व्हिडिओ शेअर करत ‘आणि आता युद्धाला सुरूवात झाली आहे’, असे कॅप्शनही दिले आहे. अंकिता चित्रपटातील या रोलविषयी बोलताना म्हणते, जेव्हा या पात्राबद्दल मी ऐकले तेव्हा मला माझ्यात आणि या पात्रात बरेच साम्य दिसले. झलकारीबाई एक शूर महिला होत्या आणि मीदेखील एक शूर महिला असल्याचे तिने म्हटले.