नेपाळमध्ये १०० रुपयाहून अधिक मुल्यांच्या भारतीय नोटांवर बंदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
भारतीय चलनातील नोटावंर शेजारील नेपाळने बंदी लागू केली आहे. १०० रुपयाहून अधिक मुल्यांच्या २००, ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा यामध्ये समावेश आहे. नेपाळ राष्ट्र बँकेने रविवारी परिपत्रक प्रसिद्ध करून याबाबतचा आदेश लागू केला आहे.
भारतीय नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळच्या मंत्रिमंडळाने डिसेंबर २०१८ मध्ये घेतला होता. नेपाळमध्ये सध्या केवळ १०० रुपये व त्याहून कमी किमतीच्या नोटा केवळ बदलून दिल्या जात आहेत. चीनच्या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. नोटांबदी केलेल्या नोटांनाही परवानगी द्यावी, अशी विनंती यापूर्वी नेपाळ राष्ट्र बँकेने आरबीआयला केली होती.
 

 
 
नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. त्यानंतर जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. नेपाळला दरवर्षी अनेक भारतीय पर्यटक भेट देत असतात. पण भारतीय नोटांवर नेपाळने बंदी लागू केल्याने तेथील स्थानिक पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारत-नेपाळमधील व्यापार ही घटण्याची शक्यता आहे.