कुस्तीपटू प्रकरण: तपासकार्यास विलंब,हायकोर्टाने सीबीआयला फटकारले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
नवी दिल्ली :
 
कुस्तीपटू नरिंसह यादवच्या 2016 सालच्या तक्रारीसंदर्भात तपासकार्य करण्यास विलंब झाल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर विभागाला फटकारले.
  
डोपिंग चाचणीत नरिंसह यादव दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या अन्नात कुणीतरी प्रतिबंधित उत्तेजित द्रव्य मिसळविल्याचा आरोप आपल्या तक्रारीतून केली होती. आज अडीच वर्षांचा काळ लोटला तरीही सीबीआयने कोणतीही कारवाई कां केली नाही, असा प्रश्न सीबीआयला केला आहे.
 

 
 
या प्रकरणाच्या तपासकार्याची स्थिती काय आहे, याचा अहवाल सादर करण्याबाबतची नोटीस कोर्टाने सीबीआयला जारी केली. तसेच या प्रकरणी पोलिस उपमहानिरीक्षक यांना लक्ष घालण्याचे व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहे. पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.