भारतीय कुबेरांच्या संपत्तीत दिवसाला 2,200 कोटींची वाढ!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
नवी दिल्ली :  भारतीय कुबेरांच्या संपत्तीत गेल्या वर्षात दररोज तब्बल 2,200 कोटी रुपयांची भर पडली आहे. गेल्या वर्षात 1 टक्का असलेले हे कुबेर आता 39 टक्क्यांनी अधिक श्रीमंत झाले आहेत, तर अर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांच्या संपत्तीत फक्त 3 टक्क्यांची वाढ झाल्याचे ‘ऑक्सफेम’ या संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
 
 
 
जागतिक आर्थिक परिषदेच्या पाच दिवस आधी हा अहवाल आला आहे. 2018मध्ये जागतिक पातळीवरील कुबेरांच्या संपत्तीत दररोज 12 टक्के म्हणजे 2.5 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक गरीब आणखी गरीब झालेत. त्यांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घट झाली आहे.
 
13.6 कोटी भारतीय 2004 पासून कर्जात बुडाले आहेत. या 13.6 कोटी भारतीयांमध्ये 10 टक्के लोक हे देशातील सर्वात गरिबांमध्ये मोडले जातात. धनाढ्य आणि गरिबांमधील ही वाढती दरी गरिबीविरोधातील लढाई, अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी आहे. यामुळे जगभरात लोकांच्या भावना अधिक उग‘ होऊ शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे.
Tags: