'पबजी'ला टक्कर शाओमीचा 'नवा गेम'ची
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
नवी दिल्ली
मुलांची सर्वाधिक पसंती असलेल्या 'पबजी'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने नवा गेम आणला आहे. शाओमीचा Survival Game एमआयच्या स्टोरवर उपलब्ध आहे. हा व्हिडीओ शाओमी आणि रेडमीच्या ग्राहकांना डाउनलोड करण्याची संधी आहे. शाओमीचा सर्विव्हल गेम १८५ एमबीचा आहे.

 
 
शाओमीचा सर्विव्हल गेम हा पबजीसारखाच आहे. एका युद्धाच्या मैदानावर आधारीत असून जिवंत राहण्यासाठी अन्य प्लेअर्सला मारणे गरजेचे आहे. हा गेम खास भारतीयांसाठी बनवण्यात आल्याचे शाओमी कंपनीने म्हटले आहे. या गेमची सुरुवात पॅराशूटहून उडी मारण्यापासून होते आणि अखेरपर्यंत जिवंत राहणाऱ्या प्लेअरला विजेता घोषित करण्यात येते. पबजी गेमची हुबेहूब नक्कल करण्यात आल्याचे दिसतेय. पबजीने नुकतीच ०.१०.५ अपडेटची घोषणा केली आहे. या अपडेटनंतर प्लेअर्सला जॉम्बी मोड, स्टेबल विकेंडी मॅप आणि नाइट मोड यासारख्या फीचर्सवर शस्त्र मिळतील. या गेमला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु, तो आतापर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध करण्यात आला नव्हता.
भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सतत १० दिवस पबजी खेळल्यामुळे एका फिटनेस टर्नरचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यानंतर पबजीवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली. तसेच १० वी १२ वीच्या परीक्षा जवळ आल्याने या गेमवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली आहे.