माजी हॉकीपटू रघवीर भोला यांचे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019

नवी दिल्‍ली :
ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन वेळा पदक मिळवून देणारे माजी हॉकीपटू रघवीर भोला यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्ष्यांचे होते.   भोला यांनी १९५६ साली मेलबर्न आणि १९६० मध्ये रोम ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून दिले होते.
 

 
त्यांना २००० मध्ये 'अर्जून' पुरस्‍काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्‍यांच्या निधनानंतर भारतीय ऑलंपिक असोसिएशनने (आयओए) आणि चाहत्‍यांनी ट्विटरवरुन त्‍यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन (एफआयएच) प्रमुख नरिंदर बत्रा यांनीही भोला यांना श्रध्दांजली वाहिली आहे. भोला यांच्या निधनाने धक्‍का बसला आहे. त्‍यांच्या आत्‍म्‍यास शांती लाभो. मी आणि माझा परिवार सिंह यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा भावना बत्रा यांनी व्यक्‍त केल्‍या.