गणतंत्र दिनी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याची शंका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांना गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला मोठे यश आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीती तीन हस्तकांना पोलिसांनी अटक केली आहे. 
या तिघांकडून दोन पिस्तुले आणि ६ जिवंत काडतुस आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. गणतंत्रदिनी ते कोणतातरी मोठा कट रचत होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दाऊदच्या टोळीकडून भारतात घातपाती कारवाया करण्याचे उद्योग वारंवार सुरू असतात. प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुरक्षा दलाने व्यापक मोहिम राबली होती. त्यात हे गुंड सापल्याने घातपाताचा मोठा डाव उधळला गेला आहे.

 
 
दिल्लीत लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन चे दहशतवादी घुसल्याची चर्चा होत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांची संख्या ५ ते ६ असू शकते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी मंदिर, मशीद, मार्केट परिसरात सुरक्षा वाढवली आहे. गणतंत्र दिन ३ दिवसांवर येऊन ठेपला असून दिल्ली पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. इंटेलिजेंस एजन्सीने राजधानी दिल्लीत आणि कर्नाटकची राजधानी बेंगळूर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची शंका व्यक्त केली आहे.