फर्ग्युसन कॉलेज होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
मुंबई,
 
पुणे येथील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रूपांतर फर्ग्युसन विद्यापीठामध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

 
फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने आणि अग्रगण्य महाविद्यालय आहे. या कॉलेजची स्थापना १८८५ मध्ये लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती. दरम्यान, फर्ग्युसन महाविद्यालयाला २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला होता.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन विद्यापीठामध्ये करण्यास मान्यता. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.