कॉर्पोरेट बॉण्ड्समध्ये परकीय गुंतवणुकीला मर्यादा कायम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मागील वर्षी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) सादर केलेल्या पोर्टफोलिओ-स्तरीय मर्यादा कायम ठेवली आहे. मागील वर्षी आरबीआयने कॉर्पोरेट बॉण्ड्सच्या गुंतवणूक मर्यादा संदर्भात काही नवीन नियम सादर केले होते. जे परकी गुंतवणूकदारांना जाचक वाटत आहेत. या निमित्ताने आरबीआयने परकी गुंतवणूकदार आणि कस्टोडियनच्या 50 जणांच्या चमूची बैठक घेतली. मात्र, आपल्या निर्णयात बदल करण्यास अनिच्छुक असल्याचे स्पष्ट केले.
 
 
कॉर्पोरेट बॉण्ड्सच्या माध्यमातून पैसे उभारताना एफपीआय एकूण रकमेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कमेचे बॉण्ड्स घेऊ शकणार शकणार नाहीत अशा प्रकारचा नियम आरबीआयने मागील वर्षी आणला आहे. तसेच एखाद्या कंपनीच्या एकूण कॉर्पोरेट बॉण्ड पोर्टफोलिओच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा परकीय गुंतवणूकदारांना असणार नाही. त्याऐवजी त्यांना तीन वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय (एक वर्षे मुदतीच्या रोख्यांमध्ये 20 टक्के मर्यादा न ओलांडता) खुला ठेवला आहे.