निवडणूक लढवण्याबाबत निव्वळ अफवा : करीना कपूर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :22-Jan-2019
मुंबई :  भोपाळ लोकसभाच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नवी खेळी खेळली जात आहे. या निवडणुकीत भोपाळमधून बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी देण्याचा डाव काँग्रेसकडून रचला जात आहे. मात्र, काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे वृत करीनाने फेटाळले आहे.
 

 
 
मी केवळ चित्रपटांवरच लक्ष केंद्रीत करण्यार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. याबद्दल करीनाला विचारले असता ती म्हणाली की, मी केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. निवडणूक लढवण्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. कोणत्याही पक्षाने माझ्याकडे निवडणूक लढण्याबाबत विचारणा केलेली नसल्याचे करीनाने सांगितले.