भारताची विजयाने सुरुवात , न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नेपियर : 
 पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गड्यांनी पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केल्यानंतर  शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार फलंदाजी केली. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या  १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, रोहित शर्मा आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. डग ब्रेसवेलने त्याला वैयक्तिक ११ धावांवर गप्टिलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला.
 

 
 
दरम्यान, सनस्ट्राईकमुळे काही वेळ खेळ थांबवावा लागल्याने भारताला ४९ षटकांत १५६ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.  शिखर धवनने एकदिवसीय क्रिकेटमधील २६ वे अर्धशतक पूर्ण केले.  कर्णधार विराट कोहली 45 धावांवर बाद झाला. अखेर शिखर धवन ( नाबाद 75) आणि अंबाती रायुडू ( नाबाद 13) यांनी भारताच्या विजय मिळवून दिला.
 
 
 
तत्पूर्वी, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी किवींच्या धावांवर लगाम लावला आणि त्यांच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. कुलदीपने चार, शमीने तीन आणि युझवेंद्र चहल याने दोन बळी टिपले. तर केदार जाधवनेही एक विकेट काढत आपली उपयुक्तता सिद्ध केली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने एकाकी झुंज देत 64 धावांची खेळी त्यामुळे यजमान न्यूझीलंडला 157 धावाच काढता आल्या.