फेब्रुवारीपासून मनोरंजन महागणार,केबल ऑपरेटरचा व्यवसाय संकटात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
दिग्रस,
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने डिटीएच व केबल सेवेसाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार विविध चॅनल्सच्या माध्यमातून होणारे मनोरंजन महागणार आहे. हे चॅनल्स 400 ते 500 रुपयांपर्यंत पडणार आहेत.
केबल चालकासह ग्राहकांकडून याबाबत विरोध होत असतानाही 1 फेब्रुवारीपासून ट्रायद्वारा नवीन नियम लागू होत आहे. या नवीन नियमामुळे केबल व्यवसाय संकटात सापडून बंद होण्याच्या मार्गावर असल्याने केबल ऑपरेटरवर उपासमारीची वेळ येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घरगुती बजेट वाढणार आहे.
ग्राहकांना फक्त त्याच चॅनल्ससाठी पैसे भरावे लागतील जे त्यांना पाहायचे आहेत, अशी गोंडस जाहिरात करून ग्राहाकांची फसवणूक होत आहे. सुरुवातीला 100 फ्री टू एअर चॅनल्सकरिता ज्यात दूरदर्शनचे 25 व अन्य बातम्या, गाणे व चित्रपट चॅनल्सचे 130 रुपये अधिक 18 टक्के जिएसटी 23 रुपये म्हणजे एकूण 153 रुपये व यानंतर आपल्या आवडत्या चॅनल्सच्या निवडीनुसार पॅकेज िंकवा चॅनल्सनुसार िंकमत पुढीलप्रमाणे राहणार आहे.
 

 
 
मराठी रसिकांसाठी झी मराठी 19 रुपये, स्टार प्रवाह 9, कलर्स मराठी 10, सोनी मराठी 4, झी टॉकीज 12, झी युवा 4 रुपये या 6 मराठी चॅनल्सचे 58 अधिक 18 टक्के जिएसटी 10 रुपये असे 68 रुपये व शंभर ‘फ्री टू एअर चॅनल्स’चे जिएसटीसह 153 रुपये व शंभर नंतर वाढणार्‍या अतिरिक्त चॅनल्सचे 20 रुपये अधिक जिएसटी 3 रुपये एकूण 23 रुपये. फ्री टू एअर व मराठी 6 पे-चॅनल्स सर्व मिळून 106 चॅनल्सचे 244 रुपये मोजावे लागणार आहेत.
िंहदी रसिकांकरिता सोनी 19 रुपये, सब 19, झी टीवी 19, स्टारप्लस 19, कलर्स 19, झी सिनेमा 19, स्टार गोल्ड 8 रुपये असे एकूण 122 अधिक 18 टक्के जिएसटी 22 रुपये असे एकूण जिएसटीसह 144 रुपये व शंभर फ्री टू एअर चॅनल्सचे जिएसटीसह 153 रुपये व शंभरनंतर वाढणार्‍या अतिरिक्त चॅनल्सचे 20 रुपये अधिक जिएसटी 23 रुपये, असे 100 फ्री टू एअर व िंहदी 7 पे चॅनल्स सर्व मिळून 107 चॅनल्सचे 320 रुपये मोजावे लागणार आहेत.यात कोणतेही इंग्रजी मुव्ही, इंग्रजी मनोरंजन किंवा इंग्रजी बातम्यांचे चॅनल्स नाहीत. ‘ट्राय’च्या नवीन नियमानुसार 1 फेब्रवारीपासून लागू होत असल्याने मनोरंजन महागणार आहे, हे मात्र खरे.