दया भाभीने सोडली मालिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची सर्वात आवडती आणि लाडकी दया बेन म्हणजेच दिशा वकानीने या मालिकेला अखेर रामराम ठोकला आहे. ती मागच्या दीड वर्षांपासून शोमध्ये दिसत नव्हती. आई झाल्यानंतरच दिशा शोपासून दूर झाली होती. पण तिच्या कमबॅकच्या बातम्या मागच्यावर्षी चर्चेत होत्या. तिला परत आणण्यासाठी निर्माते आणि चॅनेलने खूप प्रयत्न केले.

 
 
दिशा सोनी सबवर येणारा काॅमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती. मेकर्सने तिला जास्त पेमेंटचीही ऑफर दिली होती. पण तिने तरीही परत यायला नकार दिला आहे. असेही सांगितले जात आहे की, दिशाने चॅनेलला तिचे कॉन्ट्रॅक्टही संपवण्याचे सांगितले आहे. फायनली प्रोड्यूसर असित मोदींनी दिशाशियावच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शोमध्ये लवकरच आणखी दोन पात्रांचा प्रवेश होणार आहे.
  
दिशा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ व्यतिरिक्त आणखी काही सीरियल जसे खिचड़ी आणि सीआयडीमध्येही दिसली आहे. त्याबरोबरच फिल्म जोधा-अकबर, देवदासमध्येही दिशाने काम केले आहे. पण या सर्व चित्रपट आणि सीरियल्समध्ये दिशाच्या कामाला कुणीही नोटिस केले नाही.