प्रियांका गांधींचा राजकारणात प्रवेश , काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
नवी दिल्ली :
 
प्रियांका गांधी वढेरा यांनी अखेर आज अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
प्रियांका वढेरा ह्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. प्रियांका यांनी याआधीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रभाव असलेल्या अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील प्रचार केला होता. आता काँग्रेसने त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे.
 
 
राहुल गांधी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचीही सरचिटणीसपदी नियुक्ती केली असून त्याच्यावर उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी दिली आहे. तर आतापर्यंत उत्तर प्रदेशचे प्रभारी राहिलेले गुलाम नबी आझाद यांना हरियाणाचे प्रभारी बनविले आहे. अशोक गेहलोत यांच्या जागी के. सी. वेणूगोपाल यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
पहिल्यांदाच त्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणून अधिक सक्रिय भूमिका निभावणार आहेत.