शकुंतलाची बोगी जळून खाक..!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
मूर्तिजापूर:
मूर्तिजापूर रेल्वे स्थानका येथे 4 नंबरच्या फलाटावर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या गार्ड बोगीला मध्यरात्री 12.30 दरम्यान भीषण आग लागली. या आगीत 1बोगी जळून खाक झाली आहे.

 
 
मूर्तिजापूर ते अचलपूरसाठी जाणाऱ्या शकुंतला गाडीच्या 4 बोगी येथील फलाट 4 वर तयार करण्यात आल्या होत्या मात्र त्यातील गार्डसाठी असलेल्या शेवटच्या बोगीला मध्यरात्री लागलेल्या अचानक आगीमुळे ती जळून खाक झाली. इतर 3 बोगीना या आगी पासून वाचविण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले.
 
अग्नि शमन दलाची गाडी रुळांच्या आणि खड्यांच्या अडथळ्यांमुळे बोगी पर्यंत पोहोचू शकली नसल्याने पहाटे 3:30 पर्यंत बोगी जळत होती.या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची चर्चा परिसरात होती.