ब्रेक्झिटमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे नुकसान नाही
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
लंडन,
इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांचे ब्रेक्झिटमुळे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे युनिव्हर्सिटीज युके इंटरनॅशनलच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले आहे.

 
युनिव्हर्सिटीज युके इंटरनॅशनलच्या संचालक व्ही. व्ही. एन. स्टर्न येथे आयएएनएससोबत बोलताना म्हणाल्या, ‘भारतीय माता-पित्यांना ब्रेक्झिटनंतर आपल्या मुलांच्या लंडनमधील शिक्षणासंदर्भात िंचतित होण्याची गरज नाही. मलेशिया, िंसगापूर आणि चीनशिवाय भारतालाही नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे.
स्टर्न म्हणाल्या, युरोपीय संघातून इंग्लंड विभक्त होण्याच्या भीतीबरोबरच पाऊंडदेखील कमकुवत होण्याची शक्यता आहे. इंग्लंडने युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी मतदान घेतल्यानंतरही पाऊंड घसरला होता. हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये येणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरेल.
युनिव्हर्सिटीज युके इंटरनॅशनल इंग्लंडमधील विद्यापीठांचे संघटन आहे. यात इंग्लंडमधील 136 विद्यापीठांचा समावेश आहे.