कडाक्याची थंडीत तीन दहशतवाद्यांचा खातमा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :23-Jan-2019
श्रीनगर : 
जम्मू-कश्मीरमधील बर्फवृष्टीचा फायदा घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने उधळून लावला आहे. बारामुल्ला येथे लष्कर आणि दहशतवाद्यांनी चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खातमा केला.
 
 
कश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराची शोधमोहीत तीव्र झाली आहे. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीचा फायदा घेऊन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान रात्रंदिवस मेहनत करत आहेत. अशातच आज दुपारी बारामुल्ला जिल्ह्यातील बिनेर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खातमा केला.
 
 
 
दरम्यान, याआधी शोपियांममधील हेफ श्रीमल भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये काल मंगळवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीदरम्यान लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खातमा केला होता.