आईस्क्रिम मोदक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
आद्यपूजक गणराय, विघ्नहर्ता गणपतीचे, लाडक्या बाप्पांचे पूजन, उपासना दर महिन्यातील चतुर्थीला सर्वत्र आनंदाने केले जाते. पौष महिन्यात येणार्‍या संकष्ट चतुर्थीला गणरायाच्या ‘संकटविनाशी लंबोधर’ स्वरूपाची आराधना उपासना केली जाते आणि ‘मोदक’ आपल्या लाडक्या बाप्पांचा आपडता प्रसाद आहे. बाप्पाचे स्वरूप न्याहळताना त्यांच्या एका हाती मोदक तर दुसरा हात वात्सल्याचा आशीर्वादाचा आहे. ऐकदंत गणरायाचा आवडता मऊ मोदक विविध गुणी आहे, दाहकता शांत करणारा आहार स्वरूप आहे. उकळीचे, तळलेले, चॉकलेटचे आणि आता चक्क ‘आईस्क्रिम मोदक’ तेही पारंपरिक मोदकांच्या चवीला कायम ठेऊन! शुद्ध गव्हाचे पीठ वा तांदळाचे पीठ, तूप, गूळ, सुखे मेवे यांचा उपयोग करून पौष्टिक शुद्ध मोदकाचा प्रसाद तयार केला जातो. चव, आरोग्य, शुद्धता प्रसादाच्या या गुणांना लक्षात घेता. मुंबईच्या व्हॅवमोर आईस्क्रिम कंपनीने प्रयोग करून अभ्यास करून पारंपरिक स्वाद कायम ठेऊन ‘आईस्क्रिम मोदक’ तयार केले आहे.

 
 
बाप्पाला नैवेद्य लावण्याकरिता आपण अर्ध्या तासापर्यंत ‘आईस्क्रिम मोदक’ फ्रिजमधून काढून ठेऊ शकतो. आईस्क्रिम वितळण्याकरिता अर्ध्यां तासानंतर सुरुवात होते तर बाप्पाला आपण आरामात नैवेद्य लाऊ शकतो. व्हाईट चॉकलेट आणि खोबरा किसाचे आवरण खाली वेबक्रिम सुंरेख मोदकाचा आकार आणि थंड मोदकाची चव ज्यात पारंपरिक मोदकांचा स्वाद आहे.
जसे -उकळीचे पारंपरिक मोदक कोकण आणि उकळीचे मोदक हे समीकरण अत्यंत घट्ट आहे. कोकणातील पद्धतीने तयार होणार्‍या मोदकांची चवच निराळी आहे. तांदळाच्या पिठापासून तयार होणारी मऊ पारी आणि कोकणातील ओल्या खाबर्‍याचे गुळाचे, तूप घालून तयार केलेेले सारण ज्याला जायफळाचा सुगंध असलेले गरम चमचमीत उकळीचे मोदक सर्वांच्या आवडीचे आहे. तसेच तळलेले मोदक देखील खुशखुशीत पारीत रूचकर गोड सारण सर्वांना आवडणारे आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये सारणासाठी, पुरण, तिळगूळ, खोबर, सुखेमेवे, खवा इत्यादी गोड सारण घालून मोदक तयार हेातात. सारणची चव, पारीचा मेळ योग्य बसला की मोदकांचा बेत साधल्या जातो.
 
या पारंपरिक मोदकांचा उत्तम मेळ बसऊन ‘आईस्क्रिम मोदक’ तयार करण्यात आला आहे. आईस्क्रिम चाखल्यानंतर आपल्याला त्यात मोदकाचा गोडवा जाणवतो. व्हाईट चॉकलेट आणि कच्चा खोबरा किसापासून तयार झालेल्या आवरणात वेलची, जायफळाची चव, सुगंध आपल्याला मोदकाची लज्जत देते, तर वेबक्रीमची चव त्याला आणखीच खुलवते आहे. तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीला जाताना काहीतरी नवीन असा हा प्रसाद आहे. जो इतर मिठाईच्या तुलनेत उत्तम आणि हटके असा पर्याय आहे. तेच खाऊगल्लीत भटकताना बाप्पाच्या प्रसादाचा आस्वाद घेता आलातर नक्कीच घ्या!