अभिनेता सागर कारंडेही दिसणार वेबसिरीजमध्ये
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
मुंबई:  
हंगामा प्लेची आगामी वेबसिरीज श्री कामदेव प्रसन्न प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. या वेबसिरीजमधून सागर कारंडे वेबसिरीजच्या विश्वात पदार्पण करत आहे. काहीतरी हटके विषयावरील सादरीकरण प्रेक्षकांना नेहमीच भावते. वेबसिरीज या माध्यामातूनही दरवेळी काहीतरी नवीन प्रेक्षकांसमोर येत आहे. 
 

 
सागरसोबत या सिरीजमध्ये विनोदाचा बादशहा भाऊ कदमही दिसेल. याशिवाय अभिनेत्री भाग्यश्री मोटेही या वेबसिरीजमधून वेबदुनियेत पदार्पण करत आहे. आशा शेलार आणि विनय येडेकर यांच्याही भूमिका या वेबसिरीजमध्ये आहे. या वेबसिरीजबाबत भाऊ कदम खुपच उत्साहित आहे. यात त्याची हटके भूमिका आहे. आपल्या भूमिकेबाबत भाऊ म्हणतो, ‘या नव्या वेब सीरिजसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. यामध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. यातील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे.’
हंगामा डिजीटल मीडिया आणि कॅफे मराठी यांची निर्मिती असलेली ‘श्री कामदेव प्रसन्न’ ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.