गोविंदाचा भाच्याच आकस्मित मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
मुंबई :
बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांचा भाचा जन्मेंद्र आहुजाचा आज सकाळी ६ च्या सुमारास राहत्या घरी मृत्यू झाला आहे. तो ३४ वर्षांचा होता. अंधेरीतील वर्सोवा येथील यारी रोडवर त्याचा फ्लॅॅट होता. त्याचा मृत्यू नक्की कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
 
 
त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपस सुरु आहे. जन्मेंद्र हा गोविंदा यांचे मोठे भाऊ कीर्ती कुमार यांचा दत्तक घेतलेला मुलगा होता. त्याने काही चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शन केले होते. २००७ मध्ये त्याने जहा जायेगा वहा पायेगा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २००६ मध्ये जन्मेंद्र आणि त्याच्या काही मित्रांना एका महिलेला छेडल्याप्रकरणी आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली होती.