राजपथावरील एनएसएस पथकाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे- दर्पेश डिंगर करणार नेतृत्व
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019
नवी दिल्ली, 
राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. पुणे येथील िंसहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा विद्यार्थी दर्पेश िंडगर या पथकाचे नेतृत्व करणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व 14 आणि गोव्यातील 2 अशा एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनींची या पथसंचलनासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून, यापैकी 160 विद्यार्थ्यांची पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
 

 
 
मूळचा नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील तोकडे गावचा रहिवासी असलेल्या दर्पेश िंडगर याने आवाज, शिस्त, नियमितता व मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान मिळविला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर पथसंचलनात सहभागी होण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांमध्ये देशपातळीवर मोठी स्पर्धा असते. पथसंचलनातून देशातील सामर्थ्य व संस्कृतीचे दर्शन घडते. या सोहळ्यात सहभागी 160 विद्यार्थ्यांच्या एनएसएस पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळणे, ही अभिमानाची बाब असल्याची भावना दर्पेशने व्यक्त केली.
 
 
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खुशबू जोशी आणि आसिफ शेख यांनी मिळविला आहे.
 
 
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणार्‍या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेल येथे एनएसएस सराव शिबिराला 1 जानेवारीपासून सुरुवात झाली. एनएसएसच्या देशभरातील 15 विभागांमधून 200 एनएसएस विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
तभा वृत्तसेवा