राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :24-Jan-2019

 
मेष : मनात असेल ते साकार होण्याचा आजचा दिवस आहे. आराध्य देवतेचे स्मरण करा.
वृषभ : परिस्थतीचा विचार करून निर्णय घ्या. पूर्व दिशा आज लाभी आहे.
मिथून : जुना मित्र भेटेल आणि त्याच्याकडून महत्त्वाचे काम होईल. लाल रंगापासून सावध रहा!
कर्क : आपला विचार आपणच करायचा असतो, जग तुमचा विचार करत नाही. सुगंधी वस्तू जवळ बाळगा.
सिंह : इच्छांचा पाठलाग करा. त्यासाठी आप्तांची मदत होईल. पिवळा रंग लाभी आहे.
कन्या : गोड बोलून कार्यभाग साधून घ्याल. कुणाच्या अचानक दाटून आलेल्या प्रेमापासून सावध असा.
तूळ : जवळच्या आप्तांच्या मंगल कार्यात गुंतले असाल. नवी वस्त्र सांभाळून वापरा.
वृश्चिक : जुनी येणी वसुल होतील. देवधर्माच्या कामांतून शांती मिळेल.
धनू : कुणाला काही दान कराल, त्यातून आनंद मिळेल. धारधार वस्तूपासून आज धोका आहे.
मकर : व्यवहार जपून केल्यासच तुम्हाला फायदा होणार आहे. कुलदेवतेच्या मंदिरात दर्शनाला नक्की जा.
कुंभ : अचानक धनलाभ होईल. पैसा सांभाळून खर्च करा. पश्चिमेला तुमच्या समस्यांची उत्तरे मिळतील.
मीन : तुमच्या निर्णयाचे सर्वच स्तरांत स्वागत होईल. स्वप्नांत भविष्याचे संकेत मिळतील.