दोनद बुसह परिसराला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा - गहू हरभरा संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
उंबर्डाबाजार,
दोनद बुसह परिसराला 24 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटचा तडाखा बसल्याने ऐन सवंगणीला आलेला गहू, हरभरा, संत्र्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.
 

 
 
सविस्तर असे की, या वर्षीच्या हंगामात गहू, हरभरा पिकाला थंडीचा चांगला फायदा झाल्याने पिके जोमात आली. त्यामुळे शेतकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची आस लागली होती. मात्र  24 जानेवारी रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह आकस्मिक गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जोपासलेले गहू, हरभरा, संत्र्याचे पिक या गारपिटीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दोनद बु परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीनीवरील गहू हरभऱ्याची पिके जमीनदोस्त झाले आहे.
 
 
विशेष म्हणजे दोनद बुसह लहान दोनद या भागात सुध्दा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिराविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. महसुली विभागाने नुकसान ग्रस्त शेतीचा तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. 24 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने माझ्या शेतातील हरभरा पिकासह गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.