सिनेटनेही फेटाळले ट्रम्प यांचे विधेयक;शटडाऊनची कोंडी कायम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
वॉशिंग्टन 
 
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या शटडाऊनवर तोडगा काढण्यासाठी सादर करण्यात आलेली दोन विधेयके सिनेट सभागृहानेही फेटाळून लावले. यामुळे अमेरिकेतील शटडाऊनमुळे निर्माण झालेली कोंडी कायमच आहे.
 

 
 
 
मेक्सिकोच्या सीमेवरून अमेरिकेत होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी या सीमेवर िंभत उभारण्यासाठी 500.70 कोटी डॉलर्सचा खर्च मंजूर करण्यात यावा, अशी ट्रम्प यांची मागणी आहे, पण डेमॉकॅ्रट सदस्यांचे वर्चस्व असलेल्या कॉंगे्रसने गेल्या 22 डिसेंबर रोजी ती फेटाळून लावली होती. तेव्हापासूनच अमेरिकेत शटडाऊन सुरू झाले असून, त्याच्या परिणामाने सुमारे आठ लाख कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
ही कोंडी फोडण्यासठी ट्रम्प यांनी गुरुवारी सिनेट सभागृहात दोन नवे विधेयक सादर केले; मात्र या सभागृहानेही ते फेटाळून लावले आहेत. या विधेयकांवर मतदान घेतले असता विरोधात 50 आणि बाजूने 47 मते पडली.