सेलु तालुक्यात पावसा सह आलेल्या वादळी वा-याच्या थैमाने शेतपिकासह इत्तरही मोठे नुसकान-तुरळक गारांचाही झाला वर्षाव
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
वर्धा,
वर्धा हवामान खात्याकडुन विदर्भात २४,२५,२६ जानेवारीला वादळी वा-यासह गारपिठ होण्याची केलेली भविष्यवानी खरी ठरत पहील्याच दिवसी जिल्यात कित्येक ठिकानी आपला कहर दाखवित आलेल्या जोरदार वा-या सह वादळी पावसाने शेतपिका सह इत्तर ही मोठे नुसकान केले आहे.
सेलु तालुक्यात काल सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास व मध्ये राञी व आज सकाळी जोरदार वादळी वा-या सह आलेल्या पाऊसाने महाबऴ, केडझर या परीसरात आतंक मचवित मोठ्या प्रमाणात गव्हाच्या पिकाला जमिनदोस्त केले.या सह जोरदार वा-याने अनेक ठिकानी विघुत खांब वाकुन विघुत तारे तुटुल्याने कित्येक गावाचा विघुत पुरवठा खोळबंला झाला तर या वा-या मुळे झाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.वा-याचा जोर इतक्या मोठ्या प्रमाणात होती या वादळाने कित्येक घरांच्या टिना, कवेलु उडउन नेल्याने घरात पानी साचुन मोठे नुसकान झाले. तर वादळच्या या प्रकोपात केळीचे पाने फाटुन झाडे उन्मडुन पडल्याने किळेच्या पिकाला ही फटका बसला आहे.कित्येक शेतक-या शेतातिल कापुस ओलाचिंब झाला,तुर,चना पिका सह सोयाबिन पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुसकान झाले.
 

 
 
अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या शेतात कापुन ठेवलेल्या तुरी झाकण्यासाठी धावफळ झाली. अचानक आलेल्या पाऊस मुले गोधळ ,भीती निर्माण झाली.खरीप हंगामात पावसाने दळीमारल्याणे तसेच कापुस पिकावर आलेल्या बोंड अळीने शेतकरी मेडंकुटीस आलेला असतांना त्यातच काल झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले.
 
 
या वादळा सह आलेल्या पावसाने काही ठिकाणी गहू झोपला आहे तर काही ठिकाणी कापूस ओला झाला आहे अनेक शेतकरी च्या तुरी सुध्या निघाच्या आहे तूर ओली झाली आहे अश्या प्रकारे शेतात असलेल्या सर्व च पिकाचे नुकसान झाले आहे वादळी पाऊस मुळे भाजीपाला पिकाला नुकसान झाले. या वादळी पावसाचा मोट्या प्रमाणात पिकाला पटका बसला आहे. अजुन ही हवामान खात्याने दिलेल्या इशा-या प्रमाणे २५ व २६ जानेवारी हे दोन दिवस धोक्याचे असुन आभाळात ढगाची रेलचेल सुरुच आहे.