भारताचे लक्ष वर्चस्वावर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
- भारत-न्यूझीलंड दुसरा वन-डे आज
सामन्याचे स्थळः बे ओव्हल, माऊंट मांगनुई
सामन्याची वेळ ः सकाळी 7.30 वाजतापासून
थेट प्रसारण ः स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वर.
 

 
 
 
माऊंट माऊंगानुई: 
दमदार सुरुवात केल्यानंतर आता भारतीय संघाचे लक्ष पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत वर्चस्व गाजविण्यावर आहे. शनिवारी भारत व न्यूझीलंड यांच्यात येथील बे ओव्हलवर दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे.
फिरकीविरुद्ध चाचपडत खेळणार्‍या न्यूझीलंडविरुद्ध आपली आघाडी मजबूत करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. पहिल्या वन-डे सामन्यात मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांची प्रभावी गोलंदाजी व शिखर धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 8 गड्यांनी सहज विजय नोंदविला. या सामन्यात शमीने 3 बळी, दर कुलदीपने 4 बळी टिपले होते. तसेच शिखर धवनने नाबाद 75 धावांची शानदार खेळी केली होती. चांगला फॉर्मात असूनही रोहित शर्माची बॅट न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये तळपली नाही. वेगवान गोलदाज मोहम्मद शमी तसेच कुलदीप व युजवेंद्र चहल या फिरकीद्वयांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भंडावून सोडले. प्रखर सूर्यकिरणांमुळे अर्धा तास खळ थांबवावा लागला होता. कुलदीप व चहलने सहा बळी वाटून घेतले. आता हे फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाला झटपट गुंडाळण्यास उत्सुक आहे. भारताला पहिल्या विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही, परंतु क्षेत्ररक्षणात भारताकडून अनेक चुका स्पष्टपणे दिसल्या. त्यामुळे आता क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत भारतीय संघाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
विश्वचषकाच्या तोंडावर भारताची फलंदाजांची मधली फळी अद्याप निश्चित झाली नाही. कॉफी विथ करण प्रकरणामुळे हार्दिक पांड्या व लोकेश राहुलवर लादलेले अंतरिम निलंबन बीसीसीआयने मागे घेतले आहे. त्यामुळे आता ते तिसर्‍या वन-डे सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
मॅक्लिन पार्कवर वेगवान अष्टपैलू विजय शंकरला संघ व्यवस्थापनाने संधी दिली होती, परंतु विद्यमान परिस्थितीवर अवलंबून आहे. रवींद्र जडेजासुद्धा संघात परतू शकतो.
बुधवारी अंबाती रायुडूने 23 चेंडूत नाबाद 13 धावांची खळी केली होती. त्यामुळे त्याला आणखी एक संधी देण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या वन-डे सामन्यात दिमाखदार खेळी करणारा शिखर धवन पुन्हा फॉर्मात आला आहे. त्याने 75 धावांची मोलाची कामगिरी केली.
धवनसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण खेळी होती. तो भारताला विजय मिळवून देणारी खेळी कसा खेळेल, याबाबत विचार करत आहे. त्याने आपला आत्मविश्वास असाच कायम राखला तर तो विजयी खेळी निश्चित करेल. तो संघासाठी मोलाचा ठेवा ठरू शकतो, असे कर्णधार विराट कोहली पहिल्या विजयानंतर म्हणाला होता.
यापूर्वी न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताविरुद्धची मालिका 4-0 ने िंजकली होती. आता जर त्यांनी आपल्या खेळाचा दर्जा वाढविला, तर ते मालिकेत मुसंडी मारू शकतात.
पुढील सामन्यात आम्ही निश्चित दर्जेदार प्रदर्शन करू, असा विश्वास वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने व्यक्त केला आहे. कण्रधार केन विल्यम्सन एका बाजूने उत्तम फलंदाजी करत आहे, परंतु दुसर्‍या बाजूवरील फलंदाज चाचपडत खेळत आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ ः-
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्र िंसह धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, विजय शंकर, शुभमन गिल.
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, कोलीन डी ग्रॅण्डहोम, लॉकी फर्ग्युसन, नॅट हेनरी, टॉम लाथम, कोलिन मुनरो, हेनरी निकोल्स, मिशेल सॅण्टनर, ईश सोढी, टिम साऊदी, रॉस टेलर.