अँड्रॉईड स्मार्टफोन्सना स्मार्ट बनविणारे व्हर्जन्स
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
एकमेकांशी संपर्कात राहण्याबरोबरच अनेक महत्वाची कामे ऑनलाईन स्वरुपात अगदी सहजरित्या होण्यासाठी स्मार्टफोन हे महत्वाचे उपकरण ठरले आहे. मात्र, या फोनला स्मार्ट बनवण्यासाठी एक युजरफ्रेन्डली ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्यात आले आहे. जी भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरली. गुगल आणि ओपन हॅन्डसेट अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेली ही ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे ‘अॅन्ड्रॉईड’. स्मार्टफोन सातत्याने अधिकाधिक सक्षम व्हावा यासाठी या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वेळोवळी बदल केले गेले. हे बदल अॅन्ड्रॉईड व्हर्जन्सच्या रुपाने झाले. आजवर अॅन्ड्रॉईडचे १६ व्हर्जन्स आले आहेत. या व्हर्जन्सचा इतिहास जाणून घेऊयात.
 
 

 
 
 
१) पेटिट फोर : अॅन्ड्रॉईड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमची पहिले बीटा व्हर्जन (चाचणी) ५ नोव्हेंबर २००७ रोजी सार्वजनिक करण्यात आले. त्यानंतर पहिले व्यावसायिक व्हर्जन हे २३ सप्टेंबर २००८ रोजी सुरु झाले. 1.0-1.1 या क्रमांकाने पहिले व्हर्जन सुरु झाले. त्यावेळी या व्हर्जन्सना कोड नेम देण्यात आले नव्हते. तरीही 1.1 हे व्हर्जन ‘पेटिट फोर’ नावाने ओळखले जात होते. पहिल्यांदा ते एचटीसीच्या फोन्ससाठी वापरण्यात आले होते.
२) कपकेक : त्यानंतर या व्हर्जन्सना अधिकृतरित्या विशिष्ट कोडनेम देण्याची पद्धत सुरु झाली. हे कोड नेम गोड पदार्थ्यांच्या नावाने देण्याचे ठरले. त्यानुसार, २७ एप्रिल २००९ रोजी अॅन्ड्रॉईडचे पुढचे व्हर्जन हे 1.5 लॉन्च झाले याला ‘कपकेक’ असे कोड नेम ठेवण्यात आले. कपकेक हा एक आईस्क्रिमचा प्रकार आहे. यामध्ये अनेक नवे फिचर्स आणण्यात आले होते. यामध्ये MPEG-4 आणि 3GP व्हिडिओला सपोर्ट करीत होते. तसेच या व्हर्जनमुळे वेब ब्राऊझरमध्ये कॉपी पेस्ट, कॉन्टॉक्ट्सवर फोटो लावता येणे शक्य झाले होते.
३) डोनट : १५ सप्टेंबर २००९ रोजी अॅन्ड्रॉईडे तिसरे व्हर्जन आले ते 1.6 ‘डोनट’ नावाने ओळखले जाऊ लागले. यामुळे मोबाईल समोर बोलल्यानंतर त्याचे मजकुरात टाईपिंग होण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. या व्हर्जनमुळे स्क्रिनशॉटची सुविधा उपलब्ध झाली होती. अनेक फोटो डिलिट करण्यासाठी सिलेक्शन करण्याची सुविधाही यामुळे युजर्सना मिळाली होती.
४) इक्लेअर : त्यानंतर पुढच्याच महिन्यांत २६ ऑक्टोबर २००९ रोजी अॅन्ड्रॉईडने नवे 2.0-2.1 हे व्हर्जन लॉन्च केले. त्याला ‘इक्लेअर’ हे कोड नेम देण्यात आले. इक्लेअर हा चॉकलेटचा एक ब्रॅण्ड आहे. या व्हर्जनमुळे ई-मेल आणि कॉन्टॅक्ट सिंक्रोनाईजची महत्वाची सुविधा उपलब्ध झाली होती. या व्हर्जनला ब्लुटूथ 2.1 सपोर्ट करीत होता. कॉन्टॅक्टमधील नावे शोधण्यासाठी व्हर्चुअल कि-बोर्डची सुविधाही यामुळे उपलब्ध झाली होती.
५) फ्रोयो : २० मे २०१० मध्ये अॅन्ड्रॉईडने आपल्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सुधारणा करीत 2.2-2.2.3 हे व्हर्जन ‘फ्रोयो’ नावाने बाजारात आणले. यामध्ये प्रामुख्याने युएसबी आणि वायफाय सुविधा उपलब्ध झाली होती. मोबाईल नेटवर्क आणि डेटा अॅक्सेस डिसेबल करण्याची सुविधाही यातून मिळाली होती. यामुळे अल्फान्युमेरिक पासवर्ड तयार करता येऊ लागला. याच व्हर्जनमध्ये अॅडॉब फ्लॅशचा सपोर्ट मिळाला होता.
६) जिंजर ब्रेड : त्यानंतर ६ डिसेंबर २०१० रोजी 2.3-2.3.7 चे ‘जिंजर ब्रेड’ हे अॅन्ड्रॉईडचे नवे व्हर्जन दाखल झाले. यामुळे मोबाईलमध्ये सहजता आणि अधिक वेगाने काम करणे सोपे झाले. यामुळे होल्ड, कॉपी आणि पेस्ट सुविधा वापरता येऊ लागली. यामुळे गुगल टॉक आणि गुगल वॉलेट सारख्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या.
७) हनीकोम्ब : २२ फेब्रुवारी २०११ रोजी ‘हनीकोम्ब’ नावाचे 3.0-3.2.6 हे नवे व्हर्जन सादर करण्यात आले. हे केवळ टॅबलेट्ससाठी अपडेट म्हणून आणण्यात आले होते. हे व्हर्जन पहिल्यांदा मोटोरोला झूम टॅबलेटमध्ये वापरण्यात आले होते.
८) आईसक्रीम सॅन्डविच : १८ ऑक्टोबर २०११ रोजी हे 4.0-4.0.4 व्हर्जन लॉन्च झाले. या व्हर्जनमुळे मोबाईल फोन इतर कोणालाही अॅक्सेस करता येऊ नये यासाठी लॉकस्क्रिनची सुविधा उपलब्ध झाली.
९) जेली बिन : ९ जुलै २०१२ रोजी 4.1-4.3.1 हे नवे व्हर्जन दाखल झाले.
१०) किटकॅट : ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी 4.4-4.4.4 हे व्हर्जन लॉन्च झाले.
११) लॉलिपॉप : 5.0-5.1.1 हे नवे व्हर्जन १२ नोव्हेंबर २०१४ रोजी बाजारात दाखल झाले. या व्हर्जनमुळे सर्वात महत्वाची सुविधा उपलब्ध झाली ती म्हणजे अतिरिक्त डेटा एक्सटर्नल एसडी कार्डवर सेव्ह करणे. तसेच १५ नव्या भाषाही यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यामध्ये कन्नड, मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलगू या भारतीय भाषांचा समावेश होता.
१२) मार्शमेलो : 6.0-6.0.1 हे नवे व्हर्जन ५ ऑक्टोबर २०१५ रोजी लॉन्च करण्यात आले. यामुळे प्रायोरिटी मोडचे नामकरण डू नॉट डिस्टर्ब मोड असे करण्यात आले. याला युएसबी सी सपोर्ट तसेच युनिकोड आणि इमोजी सपोर्टही उपलब्ध झाला होता.
१३) नोगट : त्यानंतर २२ ऑगस्ट २०१६ रोजी ‘नोगट’ 7.0-7.1.2 हे नवे व्हर्जन अॅन्ड्रॉईडने लॉन्च केले. प्रामुख्याने पहिल्यांदा अॅन्ड्रॉईड टीव्हीमध्ये या व्हर्जनच्या वापराला सुरुवात झाली. यामध्ये अतिरिक्त इमोजीचे प्रकार आणण्यात आले.
१४) ओरियो : २१ ऑगस्ट २०१७ रोजी हे 8.0-8.1 नवे व्हर्जन बाजारात दाखल झाले. सुरक्षित ब्राऊझिंग हे या व्हर्जने प्रमुख वैशिष्ट्य होते.
१५) पाई : 9.0 हे सध्याचे लेटेस्ट व्हर्जन अॅन्ड्रॉईडने ६ ऑगस्ट २०१८ रोजी लॉन्च केले.