बजेटनुसार चॅनेल निवडण्यासाठी ट्रायचे ॲप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
नवी दिल्ली:
 
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) डीटीएच वापरकर्त्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कोणते चॅनल्स, प्लान घ्यावा याबाबतही ग्राहक साशंक आहेत. ग्राहकांच्या मदतीसाठी ट्रायने वेब अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांना आपल्या आवडीनुसार चॅनेल निवडता येतील.
 

 
ग्राहकांसाठी डीटीएच चॅनल पॅक तयार करण्यासाठी 'ट्राय'ने तयार केलेल्या वेब अॅपला 'चॅनेल सिलेक्टर' नाव देण्यात आले आहे. या वेब अॅपच्या मदतीने चॅनेलचे दर पाहता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना हवे असलेले चॅनेल निवडल्यानंतर किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज बांधता येणार आहे. निवडण्यात आलेले चॅनेल पाहण्यासाठी सर्व्हिस प्रोवाइडरसोबत संपर्क साधावा लागणार आहे. ट्रायचे वेब अॅप फक्त तुम्हाला महिन्याकाठी किती पैसे द्यावे लागतील, याचा अंदाज येण्यासाठी मदतशीर ठरणार आहे.