उमेश यादवचे 12 बळी; विदर्भ सलग दुसर्‍यांदा रणजी करंडकाच्या अंतिम फेरी- एक डाव व 11 धावांनी विजय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :25-Jan-2019
वायनाड,
रणजी करंडक क्रिकेटच्या इतिहासात गतविजेत्या विदर्भाने सलग दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे विदर्भाने केरळविरुद्धचा उपांत्य सामना त्यांच्याच घरच्या मैदानावर अवघ्या दीड दिवसातच एक डाव व 11 धावांनी िंजकला. विदर्भाच्या या शानदार विजयात विदर्भ एक्सप्रेस-वेगवान गोलंदाज उमेश यादव व कर्णधार फैझ फझलने िंसहाचा वाटा उचलला. उमेशने या सामन्यात तब्बल 12 बळी टिपले, तर फझलने 13 चौकारांसह 75 धावांचे योगदान दिले. 
 
पहिल्या डावात 7 बळी टिपणार्‍या उमेश यादवने दुसर्‍या डावातसुद्धा केरळच्या फलंदाजीच्या िंचधड्या उडवत त्यांचा निम्मा संघ गुंडाळला. उमेश यादवलाच सामनावीराने गौरविण्यात आले.
 
 
केरळच्या 106 धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाने पहिल्या डावात 52.4 षटकात सर्वबाद 208 धावा ठोकल्या. विदर्भाने कालच्या 5 बाद 171 धावांवरून पुढे डावास सुरुवात केल्यानंतर 37 धावांची भर घातली. विदर्भाच्या डावात कर्णधार फझल (75), वसीम जाफर (34) व अथर्व तायडे (23) यांनी भरीव योगदान दिले. याबरोबरच विदर्भाने पहिल्या डावात 102 धावांची जबरदस्त आघाडी मिळविली.
त्यानंतर केरळची त्यांच्या घरच्या मैदानावर दुसर्‍या डावातही घसरगुंडी उडाली व त्यांना पिछाडीसुद्धा भरून काढता आली नाही. अरुण कार्तिकने तेवढी एकाकी झुंज देत सर्वाधिक 36 धावा केल्या. कार्तिकसह जोसेफ (17) व विष्णू विनोद (15) वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना विदर्भाच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही आणि केरळचा दुसरा डाव 24.5 षटकात अवघ्या 91 धावातच संपुष्टात आला. उमेश यादवने 31 धावात 5 बळी टिपले, तर यश ठाकूरने 28 धावात 4 बळी मिळविले.
उमेशने पहिल्या डावात 48 धावात 7 बळी टिपलेत.
संक्षिप्त धावफलक
केरळ पहिला डाव ः 28.4 षटकात सर्वबाद 106.
विदर्भ पहिला डाव ः 52.4 षटकात सर्वबाद 208.
केरळ दुसरा डाव ः 24.5 षटकात सर्वबाद 91 ( अरूण कार्तिक 36, उमेश यादव 5-31, यश ठाकूर 4-28).