अक्षय कुमार साकारणार 'पृथ्वीराज चौहान' ही ऐतिहासिक व्यक्तीरेखा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
मुंबई :
तराइनच्या युद्धात मोहम्मद घोरीला लोळवणाऱ्या पराक्रमी पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट साकारला जातोय. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारणार आहे. पुढल्या वर्षी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार असून या वर्षअखेरपर्यंत शुटिंगला सुरूवात होणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
 
 
 
पृथ्वीराज चौहान यांचा जन्म वर्ष ११६६ साली झाला होता. अजमेरचे महाराजा सोमेश्वर चौहान हे त्यांचे वडील. पृथ्वीराज चौहान यांना दिल्लीचे अखेरचे हिंदू महाराज असेही म्हटले जाते. ११९१ साली झालेल्या तराइन युद्धात पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला होता.
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेन्ड सुरु आहे. त्यामध्ये 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. कंगना राणावतचा मणिकर्णिका नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर थुमाकूळ घालतोय. 
 
आगामी काळात प्रदर्शित होणारे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे चित्रपट
अजय देनवगनचा 'तानाजी : दी अनसंग वॉरियर'
संजय दत्त, अर्जून कपूरचा 'पानिपत'
करण जोहरचा 'तख्त'
वरुण धवनचा 'कलंक'
अक्षय कुमारचा 'केसरी'
अर्जून रामपालचा 'मुघल रोड'