चीनमध्ये गुगलनंतर मायक्रोसॉफ्टच्या सर्च इंजिनवरही बंदी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :27-Jan-2019
बीजिंग :
गुगलच्या सर्च इंजिनवर चीनमध्ये २०१० पासून बंदी घालण्यात आली असताना आता मायक्रोसॉफ्टच्या सर्च इंजिनवरही बंदी आणली आहे.  चीनमध्ये मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन बिंग पूर्णपणे ब्लॉक करण्यात आले आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टकडून या घटनेला पुष्टी देण्यात आली आहे.
 

 
चीनमधील सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी चायना युनिकॉम यांच्याकडून ही सदर सर्च इंजिनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली आहे. चीनमधील बिंगचा बाजारातील हिस्सा २ टक्के होता. तर चीनचे स्थानिक सर्च इंजिन बैदूचा मार्कट शेअर ७० टक्के असल्याची नोंद करण्यात आली आहे.
नोव्हेबर २०१७ मध्ये ॲपल आणि अँड्रॉइड ॲप स्टोअरच्या माध्यमातून जेव्हा मायक्रोसॉफ्टने मॅसेजिंग आणि व्हीडिओ कॉलिंग ॲप स्काईपला काढून टाकले होते. तेव्हापासून चीनमध्ये काम करण्यात मायक्रोसॉफ्टला समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.  चीनमध्ये मार्च २०१० पासून गुगललाही इंटरनेट सेन्सॉरशिपची नियमावली दाखवत ब्लॉक करण्यात आले.